घावनळे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. घावनळे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे १४ किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे २६ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १४ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ३५१५ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये अखंड हरिराम साप्ताह साजरा होतो. गावामध्ये ८ प्राथमिक शाळा आहेत. व ९ अंगणवाड्या आहेत.




